यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल,पंढरपूर शहराध्यक्ष संतोष कवडे,शहर संघटक गणेश पिंपळनेरकर,विभाग अध्यक्ष नागेश इंगोले,उपतालुकाध्यक्ष लखन घाडगे, तपकिरी शेटफळ येथील मनसे शाखाध्यक्ष नवनाथ पळसे,अण्णा कांबळे,आकाश बंदपट्टे चारही उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे शेतकरी व गरीब कुटुंबांना मनसेचा मदतीचा हात -- दिलीप धोत्रे
सप्टेंबर २७, २०२५
0
पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि गोरगरीब कुटुंबांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची डाळिंब, द्राक्ष, मका,उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.अनेक घरात पाणी शिरल्यामुळे घरातील धान्य, खाण्याच्या वस्तू, किराणामाल यांचे नुकसान झाले आहे अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे,घरात पाणी शिरले अशा कुटुंबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रत्येकी दहा हजार रुपयाची रोख मदत मनसे नेते दिली बापू धोत्रे यांच्या वतीने करण्यात आली.
Tags


